Ukadiche Modak

Ukadiche Modak

।। श्री गणेशाय नमः ।।

गणरायाच्या आगमनाची चाहुल लागली की घरातील सगळ्यांची धावपळ चालू होते. मूर्ती, मांडव, सजावट, फूल, नैवेद्य, सांकृतिक कार्यक्रम इत्यादि…ह्या सगळ्यामध्ये गणेशाचे आणि त्याच्या भक्तजनांच्या आवडत्या उकडीच्या मोदकांचे नैवेद्य म्हणून खास स्थान असते. उकडीचे मोदक हे कोकण भागात प्रामुख्याने गणपती मध्ये केले जातात.

मोदक हा संस्कृत शब्द, त्याचा अर्थ मोद देणारा ,म्हणजेच आनंद देणारा. मोदकाचा आकार हा नारळाच्या आकारा सरखा, म्हणजेच तो ही नारळासारखा सर्वगुण सम्पन्न.आज आपण उकडीचे मोदक वर्षा ऋतु मध्ये का खाल्ले जातात याचे शास्त्रीय कारण बघुयात.

गणेशोत्सव हा वर्षा ऋतुच्या शेवटी येतो. वातावरण कोंदट, गार व ओलसर झालेले असते. अश्या वातावरणामुळे अन्नपचन मंदावते, वात वाढतो आणि ह्या संबंधीचे विकार होऊ लागतात. भात, गुळ वापरून बनवलेले मोदक अश्या वातावरणामध्ये सर्वात उत्तम खायला.

ह्या ऋतु मधे कोकण परिसरात नारळ, नवीन उपसलेला तांदुळ व जूना गुळ हे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. श्रावण महिन्यात तांदुळाच्या पिठाचे पातोळे करून तांदुळ किती चिकट आहे हे घरातील गृहिणी जाणुन घेते. तशी ती चांगल्या उकडीसाठी किती पाणी घालायला लागेल ह्याचा आढावा घेते. साधारणपणे १(तांदुळ पिठी):१(पाणी) असेच माप असते.

उकडीच्या मोदकाला ओले खोबरे व गुळ यांचे शिजवलेले सारण असते. त्यात वेलचीपूड, जायफळ,खसखस चव आणि सुगंध वाढ़वण्यासाठी घातले जाते.

तांदुळ पचायला हलका , तांदुळाच्या पिठाची उकड पचायला सोपी असते. मोदकाची पारी पातळ असावी. साचा वापरून केलेल्या मोडकाची पारी जाड़ असते म्हणून हातावरचे मोदक सर्वात उत्तम.

नारळाचे ओले खोबरे पचायला जड व सिंग्ध, पित्तशामक असते. शरीरातील दाह कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकरक.गुळ हा पचायला जड, उष्ण तत्वचा, कफ-वात व थकवा कमी करणारा असतो. माझ्या सासु बाईंच्या प्रमाणे गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला असतो.

वेलची, जायफळ, खसखस हे पचन सुधारण्यास , पित्तशामक व थकवा दूर करण्यास मदत करतात.मोदका सोबत गाईच्या दुधाच्या लोण्यापासुन केलेले तुप खल्ल्याने, मोदक पचायला अजुन सोपा होतो.आपल्याला चयापचायासाठी लागणारे सर्व घटक ह्या एका मोदका मध्ये मिळतात.

जसं कोकणात, तसेच देशावर, तळलेले मोदक केले जातात. तांदुळच्या ऐवजी कणिक, गुळा ऐवजी साखर व ओल्या ऐवजी सुकं खोबरं वापरले जाते.पण दोन्ही प्रकारामधे पारी पातळ व सारण बेताचे असावे.

उकडीचे मोदक हे वाफवून तेंव्हा तयार होतात जेंव्हा त्यांच्यावर एका प्रकाराची छान चकाकी येते. असे पूर्णपणे शिजलेले मोदक, थोडेसे निवले की खावेत. शक्यतो ठंड किंवा freeze करून पुन्हा उकड़ू नयेत.

मग ह्या वर्षी आपल्या हातानी उकडीचे मोदक करून बघा. आपल्या सोबत आपल्या घराच्यांना, मुलांना नारळ आणणे, खवणे, गुळ चिरणे, सारण करणे, मोदक वळणे ह्या सगळ्या मधे सामावून घ्या आणि घरी केलेल्या पहिल्या वाफेवरचे मोदक किती सुंदर लागतात ते बघा.
जर मोदक बनवता येत नसतील तर ह्यापेक्षा चांगली वेळ व संधी नाही शिकायची. मी आहेच मदत करायला.

ह्या वर्षी मोदका सोबत बटाट्याची भाजी, चिंच गुळाची आमटी, नारळाची चटणी, सुराळीच्या वडया, वरण भात, व कोशिंबिर असा बेत मी ठरवलेला आहे. तुमचा???

चांगला नारळ कसा ओळखयाचा ते इथे बघा

 

If you like the post , please share with your family , friends and colleagues


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *