How to Identify a good coconut?

How to Identify a good coconut?

नारळी पौर्णिमे निमित्त आज घरी नारळी भात करायचा होता. नारळ आणायला गेले असताना जवळ उभी एक चिमुकली आपल्या आईला विचारात होती. आई नारळ चांगला कसा गं ओळखतेस. तिचा प्रश्न मला माझ्या बालपणात घेऊन गेला.

मुलुंड पूर्वला स्टेशनच्या बाहेर ऐक नारळवाले काका असायचे. माझी पहिली आठवण नारळाची ह्यांच्याकड़ेच. नारळाचा मोठा ढिग , त्याच्या शेजारी उभे ते काका आणि त्यांच्या बोटातली जड पितळी आंगठी.

नारळ चांगला आहे की नाही हे कसे ओळखायचे त्यांच्याकडूनच शिकले. ते नारळ चांगला तीन चार वेळा त्यांच्या अंगठीने वाजवून बघायचे आणि मला द्यायचे. हा घे आणि बिंदास्त घरी घेऊन जा, अजिबात खवट निघणार नाही असे सांगायचे. अगदीच कधी खराब निघाला तर बदलून द्यायचे. त्यांच्याकडे नारळ खराब निघाला तर आमची जबाबदारी नाही, हा नियम कधीच नसायचा.

घरी येताना खुप तहान लागली असेल तर ट्रेन मधुन बाहेर अलं की काकांना भरपूर पाणी नारळ द्या असं हक्कानी सांगायचं. एका दमात नारळ फोडून द्यायचे आणि मी ते पाणी गटागट पिऊन टाकायचे.

कधी आईला बाजारात चार ठिकाणी जायचे असले तर ती ह्या काकांच्या इथे मला ठेवायाची आणि पटकन तिची कामंं करून यायची.

मला कधी त्यांचे नाव मात्र विचारावेसे वाटले नाही. नारळ वाले काका हिच माझी ओळख.

हल्ली असे काका बघायला मिळत नाहीत. नारळ चांगला नाही निघाला तर कोणी परत घेत नाही, घेतलाच तर दूसरा चांगला निघेल ह्याची शाश्वती नाही. Online grocery shopping च्या जमान्यात नारळवाले काका हरवून गेले. आज का कोण जाणे त्यांची खुप आठवण येते आहे.

आज केलेला नारळी भात आपल्या बालपणीच्या नारळवाल्या काकांच्या आठवणीं साठी.

Narali Bhaat
Narali Bhaat

चिमुकाली च्या प्रश्नाचे उत्तर. चांगला नारळ असा ओळखायचा.

१. नारळ वाजवला की टांग टांग आवाज झाला पाहिजे. ही खरी चांगल्या नारळाची ओळख.

२. नारळा ला कुठेही चीर पडली असली नाही पाहिजे. तो बहेरुन ओला नसावा.

३. नारळ हाताला जड़ वाटला पाहिजे. हलके नारळ कदाचित खराब आणि कमी चविष्ट असु शकतात.

४. भारतात नारळाची शेंडी काढत नाहीत पण समजा ती काढली असेल तर त्याचे ३ डोळे बघवेत. डोळे काळे असले पाहिजेत व त्यावर बुर्शी नसली पाहिजे. तसे असेल तर नारळ खराब व्हायला लागला आहे. नारळाचा एक डोळा मउ असतो, त्याला ईजा झाली असेल तर त्यातून पाणी बाहेर येऊन नारळ खराब होउ शकतो.

५.नारळ हलवला की त्याच्या आतले पाणी ऐकू आले पाहिजे. कमी पाणी असलेला नारळ खराब असतोच अस काही नाही, कमी पाणी असलेला नारळ वपरता येतो पण पाणी असेल तर खोबरं कोवळे असते, त्याचे गोड़ पदार्थ अजुन रुचकर होतात म्हणून असा नारळ निवडायचा.

Till Next Time, Bon Appetite,

Love and Luc,
Apps

If you like the post , please share with your family , friends and colleagues


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *